साहेबराव अंभोरे @ग्रामीण प्रतिनिधी
दि.२४ एप्रिल २०२५ रोजी ज्योतिराव वानखेडे (कॉन्ट्रॅक्टर) छत्रपती संभाजीनगर नगर यांच्या संकल्पनेतून बाळ प्रियांश पंकज वानखेडे याच्या नामकरण सोहळ्या निमित्त कैलास राऊत व संच हदगाव जि.नांदेड व 'स्वरसम्राट' गायन संच,मेहकर यांचा प्रबोधनात्मक गायन कार्यक्रम, आंध्रुड ता.मेहकर जि.बुलढाणा येथे संपन्न झाला.
सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्यांचे पुष्प,दीप, धूप, मेणबत्ती व अगरबत्तीने पूजन पंढरीनाथ वानखेडे व जिजाबाई वानखेडे यांनी केले.त्यानंतर साहेबराव अंभोरे यांनी बुद्धवंदना घेऊन नामकरण सोहळा पार पाडला. त्यानंतर गीतगायनला सुरुवात झाली.
यावेळी कैलास राऊत व संच , हदगाव व ' स्वरसम्राट ' गायन संच,मेहकर यांनी गीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. कलावंतांनी महापुरुषांची गीते गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.एकता,बंधुता, सामाजिक सलोखा, फुले आंबेडकर कार्य अशा विविध प्रबोधनपर गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.
भीमशाहीर कैलास राऊत,गायक शाहीर भिमराव अंभोरे, साहेबराव अंभोरे, दत्ता पवार, यांच्या सुरेल गायन व शेरोशायरीने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी स्वरसम्राट गायकांनी निळ्या पाखरांची वंदना भिमराया, समानतेचा सूर्य उगवला, वानखेडे कुटुंबात आला बारशाचा मंगल दिन त्याच्या पायामध्ये वाजते वाळ कसं खेळतं दिपालीचं बाळं, जवा आले भिमराव तवा आला आम्हा भाव, झाले जीवनाचे सोने बा भीमाच्यामुळे,फॉरेनला धनी माझं गेलं ग बाय ही गीते गायली तर भीमशाहीर कैलास राऊत यांनी शरण बुध्दाला ये, शरण धम्माला ये, शरण संघाला ये, मानवा ,आलो आम्ही नामकरणाला ,ज्या हातानं काढलं शेण, त्या हातात आला पेन, असं होत रमाईच नांदन माय,भीमराया तुझ्या घराण्याला कधी बैमान होणार नाही. अशी एक से बढकर एक गीते सादर केली. गायक कैलास राऊत यांच्या संचात तबला वादक समाधान राऊत ढोलक वादक अंकुश डाखोरे बेंजो प्रशांत गाडेकर कोरस विशाखाताई नांदेडकर विजयमाला नरवाडे रमेश परघणे यांनी दिला.
स्वरसम्राट गायन संचासाठी कोरस सत्यभामा कांबळे,पार्वता सुरडकर,आशा टेकाळे, रंजना पवार, दगडू पवार यांनी दिला.तर महाराष्ट्राचे प्रख्यात बॅन्जो वादक संदीप बोदडे,ढोलकपटू अशोक जावळे, राहुल पवार तबला नितीन इंगळे ऍक्टो पॅड ज्ञानेश्वर धनभर आणि हार्मोनियम वादक साहेबराव अंभोरे यांच्या तालबद्ध वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रम दर्जेदार आणि बहारदार झाला.
कार्यक्रमाच्या आयोजन व यशस्वीतेसाठी ज्योतिराव वानखेडे, उद्धव वानखेडे, सतिष वानखेडे, मनोज वानखेडे व मित्रमंडळ यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी वानखेडे परिवाराकडून उपस्थितांसाठी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमातून देशहित, समाजहित, आणि बाबासाहेबांचे अनमोल विचार समाजामध्ये रुजवण्याचे महत्त्वाचे कार्य झाले.
कार्यक्रमाला पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. आंध्रुड हे कलावंतांचे गाव असून सामाजिक सलोखा व एकता यासाठी या गावाची ओळख आहे हे विशेष.
Social Plugin