पाटण (दिनकर वाईकर)
पाटण नगरीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित 'जल्लोष' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन युवा उद्योजक व कोयना एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा.श्री.याज्ञसेन पाटणकर (दादा) यांनी श्रीफळ वाढवून केले. यावेळी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप पर्यटकांना व ऑपरेशन 'सिंदूर' मध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच यात्रा कमिटीकडून श्री महालक्ष्मी देवीच्या नुतन मंदिर बांधणीसाठी ५ लाख रुपयांचा चेक सुपूर्द करण्यात आला.
यावेळी पाटण नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष व यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री.सचिन कुंभार, माजी नगराध्यक्ष श्री.संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष श्री. अजय कवडे, माजी सरपंच श्री. चंद्रकांत मोरे, नगरसेवक श्री.स्वप्निल माने, नगरसेवक राजेंद्र गायकवाड, नगरसेवक श्री.संजय इंगवले, श्री.शशिकांत देवकांत, श्री. मनोहर यादव, श्री.गणेश मोरे, श्री.सुरज जगताप, श्री. गणेश मोरे, श्री. वामन भिसे, श्री.धैर्यशील पाटणकर, श्री. जगजीत पाटणकर, श्री. विकास ढवळे,श्री.संतोष इंदूलकर, यात्रा कमिटी सदस्य व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin