Ticker

6/recent/ticker-posts

दिवंगत वडिलांच्या अन्नदान व्रतासाठी हर्षद संकपाळ यांच्याकडून १ लाखाचा धनादेश



सेवागिरी मंदिरात प्रत्येक वर्षी १३ जानेवारी रोजी होणार अन्नदान

 बुध  दि.  [प्रकाश राजेघाटगे ] 

 आपल्या वडिलांनी सलग पाच वर्षे सुरु ठेवलेले पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांच्या मंदिरातील अन्नदानाचे व्रत त्यांच्या पश्चात प्रत्येक वर्षी १३ जानेवारी रोजी सुरू रहावे यासाठी हर्षद जगन्नाथ संकपाळ यांनी १ लाखाचा धनादेश नुकताच सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती प. पू. सुंदरगिरी महाराज यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या पितृभक्तीचे कौतुक होत आहे.

मूळचे जायगाव येथील जगन्नाथ कोंडिबा संकपाळ हे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मुंबईच्या व्ही. टी. या मुख्य शाखेतून वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत असताना निवृत्ती घेऊन ते पुसेगावमध्ये स्थायिक झाले होते. अत्यंत धार्मिक वृत्तीच्या जगन्नाथ संकपाळ यांनी पाच वर्षांपूर्वी येथील सेवागिरी मंदिरातील

दैनंदिन अन्नदानापैकी वर्षातील एक दिवस म्हणजे १३ जानेवारीच्या अन्नदानाची जबाबदारी स्वीकारली. त्यांचे हे व्रत सलग पाच-सहा वर्षे नित्यनेमाने सुरू होते. गेल्या वर्षी २० फेब्रुवारी २०२४ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. मात्र त्यांचे चिरंजीव हर्षद संकपाळ यांनी आपल्या हयातीतच नव्हे तर कायमस्वरूपी प्रत्येक १३ जानेवारीला त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हे अन्नदानाचे कार्य पार पाडण्यासाठी दि.१२ मे रोजी

देवस्थानचे मठाधिपती १०८ सुंदरगिरी महाराजांकडे ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव व संतोष वाघ यांच्यासह उपस्थित युवा नेते धीरज जाधव, भाजप नेते भरत मुळे ,   हॉटेल  साईशचे    वैभव चव्हाण,   शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष   विशाल  जाधव,   दिग्विजय चव्हाण ,   प्रमोद पवार,  तानाजी लावंड, पृथ्वीराज पाटिल,   जितेंद्र चव्हाण ,  उद्योजक शैलेश मुळे ,  दीपक तोड़कर, अंकुश शिंदे    व ग्रामस्थांसमोर श्री सेवागिरी देवस्थानट्रस्टच्या अन्नदानाच्या उपक्रमासाठी १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

हर्षद संकपाळ हे विरार व वसई येथे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांची भरीव कामगिरी आहे. वडिलांचे कार्य पुढे चालवणे म्हणजे धर्म आणि तो धर्म अगदी उत्तमपणे निभावण्यासाठी तसेच वडिलांच्या पश्चात नव्हे तर कायमस्वरूपी वडिलांच्या स्मरणार्थ १३ जानेवारी रोजी महाप्रसाद के. जगन्नाथ कोंडिबा संकपाळ यांच्या नावाने देण्याची त्यांची भावना आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल पुसेगाव ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. इतरही अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येवून या कायमस्वरूपी अन्नदानाच्या कार्यात महभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

छायाचित्र _ पुसेगाव .प.पू. सुंदरगिरी महाराज यांच्याकडे एक लाखाचा धनादेश सुपूर्द करताना हर्षद संकपाळ, शेजारी डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, भरत मुळे व पुसेगाव ग्रामस्थ.