Ticker

6/recent/ticker-posts

ब्लू चिप कॉन्व्हेंटचा १०० टक्के निकाल



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि

कारंजा(लाड ) फेब्रुवारी २०२५ घेण्यात आलेल्या ला एस. एस. सी. परीक्षेचा निकाल १३ मे रोजी घोषित करण्यात आला असून, यामध्ये येथील ब्लू चिप कॉन्व्हेंटने यावर्षी देखील १०० टक्के निकाल देण्याची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.

शाळेतून प्रथम क्रमांक प्रणव संजय हेडाऊ ९३.६०टक्के , द्वितीय क्रमांक मृणाल गजेंद्र हातोले ९२.४०टक्के, तृतीय क्रमांक भक्ती देवानंद खाडे ९१.२० टक्के, अक्षता वसंत इंगळे ९० टक्के, नयन नंदकुमार कांबळे ८९ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. त्याचप्रमाणे शाळेतून विषेश प्राविण्य श्रेणीमध्ये ३५ तर प्रथम श्रेणी २२ विद्यार्थ्यांनी

यश संपादन केले आहे. या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष अशोककुमार उपाध्यक्ष आनंद इन्नाणी अशोककुमार इन्नाणी, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता गजानन परळीकर व शिक्षकवृंद यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या