प्रतिनिधी:- मोहन जाधव.
चास नळी: – रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा मार्च २०२५ मध्ये झालेल्या एस.एस.सी.परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा शे.निकाल ९४.८७ इतका लागला. विद्यालयाची धवल यशाची परंपरा राखणारे प्रथम तीन मानकरी विद्यार्थी पुढील प्रमाणे कु. तिडके प्रणवी विनोद ४६७ ( ९४.००%) चौधरी लोकेश पोकाराम ४६२( ९३.००%) कु. बारगळ समीक्षा गणपत ४६१(९२.८०%) देशपांडे यशराज शैलेश ४५०(९०.६०%) शिंदे सार्थक रमेश ४३७(८८.००%) वरील विध्यार्थी पहिल्या पाच क्रमांका ने उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचे एकूण ११७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.
त्यापैकी १११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.सर्व उत्तीर्ण विध्यार्थी व पालकांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे उत्तर विभागाचे अध्यक्ष माननीय आमदार आशुतोषदादा काळे साहेब, इन्स्पेक्टर बोडखे साहेब, सहाय्यक इन्स्पेक्टर तोरणे साहेब, नाईकवाडी साहेब, प्रकाश तिडके पाटील (उद्योजक नवी मुंबई) स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव तिडके, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सचिन चांदगुडे, सिताराम पाटील गाडे, भास्कर चांदगुडे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक जामदार सर, मनेष गाडे, चासनळीचे सरपंच सुनीता बनसोडे उपसरपंच विनायक गाडे, विद्यालयाचे प्राचार्य मांडवडे ए.आर. विद्यालयाचे पर्यवेक्षक चंदने पी आर. विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, माता पालक संघ, पालक संघ, शालेय व्यवस्थापन समिती व विकास समिती सदस्य, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांच्या वतीने सर्व उत्तीर्ण विध्यार्थी /विद्यार्थीनींचे व पालकांचे अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Social Plugin