गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
26 जून 2025 रोजी मंगरूळपीर जूनी पंचायत समिति सभागृह, येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151व्या जयंती निमित्त भव्य सत्कार कार्यक्रम एकता पत्रकार संघटनच्या वतिने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला समाजातील सर्व थरातील लोकांनी मोठ्या उत्साहाने आणि आदराने हजेरी लावली
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री.रवि राठोड साहेब प्रभारी तहसिलदार मंगरूळपीर, यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा.जे ज़े भगत विपश्यनाचार्य साहेब ,यांनी भूषवले. प्रमुख वक्ते म्हणून मा. दिपक राऊत,आदर्श कवि उपस्थित होते, ज्यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथीम्हणून मा.श्रीकांत माने, गटशिक्षणाधिकारी पं.स. मंगरूळपीर, श्री शरद इंगोले नगर परिषद मंगरूळपीर,एस डी जाधव, समाजसेवक, मिर आशिक अली समाजसेवक, शेषराव खोडके साहेब प्रभारी समादेशक गृह रक्षक दल मंगरूळ्पीरउपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.
या विशेष कार्यक्रमात होम गार्ड आणि इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हे विद्यार्थी आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने शाळेचे नाव उज्ज्वल करत आहेत. त्यांच्या प्रोत्साहनार्थ आणि गौरवासाठी हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित व्याख्यान. श्री.रवि राठोड प्र. तहसिलदार,श्री किशोर शेळके ठाणेदार पोस्टे मंगरूळपीर,श्री. दिपक राऊत,यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थितांना नवीन दृष्टिकोन आणि प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांमुळे उपस्थितांमध्ये शाहू महाराजांच्या कार्याबद्दल नवीन जागरूकता निर्माण झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉं.प्रमोद तायडे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन एकता पत्रकार संघटन संस्थापक अध्यक्ष आणि अशोक राऊत राधेश्री यांनी केले, तर सत्कार समारंभाचे सूत्र संचालन एकता पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष विनोद डेरे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री.गज़नफर हुसेन पत्रकार यांनी केले.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन एकता पत्रकार संघटनच्या सक्रिय सहकार्यात पार पडले. समारंभात विविध मान्यवर, कर्मचारी गण, विद्यार्थी, पालकवर्ग, आणि नागरिक मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या प्रतिसादामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानत, व राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रम संपन्न झाला . या जयंती उत्सवाच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन विनोद डेरे यांनी केले होते. कार्यक्रमास मुक्तार सागर,गजनफर हुसेन, संदीप कांबळे, राजेश वानखडे, अशोक राऊत राधेश्री ,मुदस्सीर सौदागर,
प्रा डॉ प्रमोद तायडे ,नितीन गांवडे,डिंगाबर अव्हाळे, प्रा डॉ संजीव इंगळे,गणेश बोथे,गोपाल सुर्वे ,संतोष चव्हाण पदाधिकारी तथा सदस्य एकता पत्रकार संघटनेचे पत्रकार मुसळधार पाऊस असूनही सुद्धा एकता प्रेस संघटनेच्या छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त मान्यवर अधिकारी व पालक व गुणवंत विद्यार्थी भरभरून उपस्थित होते.
Social Plugin