पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि
कारंजा(लाड ) भारतीय जनता पार्टी कारंजा शहरतर्फ भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, राष्ट्रीय अखंडतेची मूर्तीमंत व्यक्तिमत्व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे वाशिम जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांच्या सूचनेनुसार व आमदार श्रीमती सईताई डहाके तथा भाजपा जेष्ठ नेते नरेंद्र गोलेच्छा यांच्या मार्गदर्शन ाखाली येथील विश्रामगृह येथे २३ जून रोजी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यातआली. तसेच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजप शहर अध्यक्ष प्राजक्ता उमेश माहीतकर, सुनील गुल्हाने, महेंद्रशेठ लोढाया, देवव्रत डहाके, तेजस्विनी डहाके, निशाताई गोलेच्छा, प्रीतीताई धाकतोड, प्रभाकर घोडसाड, विनीत गोलेच्छा, भूपेंद्र हरिहर,सागर आवटे, शिशुपाल शिंदे, रवीजीत धामणकर, आदर्श उटाले, शरवी राऊत, वसुंधरा टीमच्या अध्यक्षा निताताई लांडे, आशाताई आंबाडकर, रेणुकाताई राऊत तसेच भारतीय जनता पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
Social Plugin