बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
राजर्षी शाहू महाराज यांनी प्रजाहितदक्षपणे राज्य चालविले .कला, संस्कृती, क्रीडा,व्यापार ,आरोग्य ,शिक्षण इ.क्षेत्राचा विकास केला. म्हणूनच राजर्षी शाहू महाराज हे लोकशाहीवादी आणि समाज सुधारक होते असे प्रतिपादन डॉ. अनिल जगताप यांनी केले.
पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात इतिहास विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रम संपन्न झाला त्याप्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीत रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्रा. डॉ. संजय क्षीरसागर प्र. प्राचार्य डॉ.आर.पी. भोसले, प्रा श्रीमती एम.बी. सोनार इत्यादी उपस्थित होते.पुढे ते आपल्या भाषणात म्हणाले,'अस्पृश्य मानले गेलेल्या लोकांना त्याकाळी आश्रय दिला. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले. गंगाराम या दलित व्यक्तीला कोल्हापुरात हॉटेल सुरू करुन दिले. अशा प्रकारे महाराष्ट्र पुरोगामी बनविण्यात संस्काराचा प्रचंड वाटा आहे. तसेच कोल्हापूर संस्थानात अनेक लोक हिताचे चांगले निर्णय घेतले. आणि प्रतिकूल परिस्थितीत शाहू महाराजांनी यशस्वी करून दाखविले समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. बहुजन समाजासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा कार्याचा वारसा समर्थपणे चालविणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार कार्ये करण्याचेही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पाडली
.शाहू महाराजांनी प्रत्येक जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढले .वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष हा महाराष्ट्रातील सामाजिक जीवनातील एक मोठं वादळ होतं याविषयीची माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आ.पी.भोसले म्हणाले, शाहू महाराजांनी समाजातील उपेक्षित व अस्पृश्य वर्गातील लोकांसाठी सामाजिक न्यायची भूमिका घेऊन त्यांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये क्रांती केली .याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. श्रीमती एम.बी.सोनार यांनी केले. तर आभार प्रा.उज्वला मदने यांनी मानले .कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin