कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
जालना: सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संचलित डॉ.के.ब. हेडगेवार चल चिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरातील पावरलूम येथे आरोग्य शिबिराला प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित रूग्णांना डॉ. परीक्षित देशपांडे यांनी बीपी, शुगर, बेसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयी माहिती दिली. तसेच डॉ. दिनेश जोशी यांनी उपस्थित रुग्णांना दैनंदिन जिवन चक्र कसे असावे या बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमित हजारे यांनी केले, तर सूत्रसंचालन राजू वाघमारे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार विजयमाला रौंदळे यांनी मानले, यावेळी रावसाहेब खुपसे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Social Plugin