Ticker

6/recent/ticker-posts

स्वामी आई महिला ग्रामसंघाचे उत्कृष्ठ कार्य



रांजणगांवदेवी ( प्रतिनिधी ) 

शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागा अंतर्गत महिलांच्या विकासासाठी ग्रामस्तरावर बचत गटाची निर्मिती करून महिला सक्षम करण्यासाठी शासनामार्फत बँकेच्या सहकार्याने महिलांना छोट्या मोठ्या उद्योगासाठी बचत गटाच्या माध्यमातून कमी व्याजदराने कर्जपुरवठा केला जातो व हप्त्या हप्त्याने कर्ज व अल्प व्याज घेऊन कर्ज वसुल करण्यात येते शासनाच्या या योजने नुसार रांजणगाव येथे सन 2023 मध्य स्वामी आई महिला ग्रामसंघाची निर्मिती होऊन प्रथमतः दारीद्रय रेषेखालील कुटुंबातील महिलांचा गट स्थापन करण्यातआले त्यानंतर अल्प भुधारक कुटंबातील

 महिलांना सामावून घेत निरनिराळ्या योजनांचा लाभ देण्यात आला रांजणगांव येथील संगिताताई वाळुंजकर    यांनी योग्य नियोजन व मार्गदर्शन करून गयाला बँकेकडून कर्ज मिळून दिले महिलांची मासिक मिटींग जमा खर्चाचा सर्व हिशोब व्यवस्थित मांडून आज मितिस ३६ गट स्थापन करून व्यवस्थित सुरु आहेत या सर्व महिलांना एकत्रित करून मिटींग घेणे कर्जाची वसुली करणे या कामी गटाची स्वःताचे कार्यालय असावे म्हणून आज जि प प्रा शाळा येथे उपलब्द असलेल्या जास्तीच्या रूममध्ये शालेय कमिटी ग्रामपंचायत व गट विकास अधिकारी यांच्या संमतीने कार्यालयाचे उद्घाटन गट विकास अधिकारी संजयजी लखवाल साहेब यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी नेवासा पोलीस स्टेशनचे आहीरे साहेब ढमाले साहेब बॅक ऑफ बडोदा शाखा भेंडाचे शाखाअधिकारी दिपक कुमार साहेब भानसहिवरा मंडलाचे मंडल अधिकारी मुंढे मॅडम कामगार तलाठी काळे मॅडम ग्रामविकास अधिकारी रमेश गायके मुख्याध्यापिका तिपोळे मॅडम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडूरंग जावळे रांजणगांवच्या सरपंच कल्पना ताई लोखंडे पो.पाटील बबनराव शिंदे अभियान व्यवस्थापक सोनवणे साहेब भेंडा येथील मा सरपंच रोहिणीताई निकम नामदेव निकम काळे साहेब कोरेगांवचे सरपंच गोरख सातदिवे प्रिति शहा मॅडम देशमुख मॅडम मिनाताई कदम पंडित सर कांबळेसाहेब बाबासाहेब आल्हाट पेत्रस कांबळे बबन आल्हाट पत्रकार अशोक पंडित पत्रकार औताडे पत्रकार आदेश जावळे दत्तात्रय पंडित अदी ग्रामस्थ व बचत गटाच्या महिला व अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते PI आहिरे साहेब यांचे हस्ते संदेश महिला बचतगट रांजणगांव यांना २५ लाख व गरविकास अधिकारी यांचे हस्ते स्वामी आई ग्रामसंघास २१लाख ६० हजार रु कर्जाच्या चेकचे वितरण करण्यात आले या प्रसंगी PI अहिरे साहेब ग्रामसेवक गायके बबन शिंदे शोभाताई घोरपडे बॅक मॅनेजर दिपक कुमार सर अदिनी गटाचे कार्य पैशाचे नियोजन अदी विषयावर आपले विचार मांडले या प्रसंगी दरवर्षी ३१ मे रोजी ग्रामपंचायत मार्फत दिला जाणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तुत्ववान महिलांना दिलाजाणारा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार या वर्षी संगिताई वाळुंजकर व ग्रामपंचायतच्या सरपंच कल्पनाताई लोखंडे यांना अध्यक्षांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले अध्यक्षीय भाषणात गर विकास अधिकारी यांनी शासनाच्या बचन गर निर्माण करण्या विषयीचे धोरण मिळालेल्या कर्जाचा योग्य उदयोगधंदा करण्यासाठी उपयोगव उद्योगातून मिळालेल्या नफ्यातून बँकेचे व्याज व मुद्दल फेडावे आपल्या उद्योगाचा प्रचार व प्रसार करावा अशी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन पत्रकार आदेश जावळे यांनी केले कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना गोड जेवणाची मेजवानी देण्यात आली