डॉ. गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा :हरितक्रांतीचे प्रणेते,महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या ११२ व्या जयंतीचा कार्यक्रम विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यासंदर्भात सहविचार सभेचे आयोजन कारंजा येथील महानायक वसंतरावजी नाईक सामाजिक सभागृह, बंजारा कॉलनी येथे करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारंजा तांड्याचे नायक भिकासिंगजी राठोड हे होते. सभेत १ जुलै २०२५ ला महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणे.
कारंजा शहरामधुन मोटर सायकलने रॅली काढणे, वृक्षारोपण करणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सहपत्नीक सत्कार करणे, वसंत व्याख्यानमाला आयोजीत करणे अशा विविध विषयावर सर्वांनुमते चर्चा झाली. सभेत विष्णुजी आडे से.नि.PSI यांची "वसंत उत्सव आयोजन
समिती, कारंजा" च्या अध्यक्षपदी सर्वांनुमते निवड करण्यात आली. सभेला कारंजा जेष्ठ नागरीक /सामाजिक कार्यकर्ते, व समाज बांधव त्यामध्ये कारंजा तांड्याचे नायक भिकासिंग राठोड, हिरासिंगजी राठोड से. नि. पोलीस निरीक्षक, सुभाषरावजी जाधव से.नि. तहसिलदार, महादेवराव आडे से.नि. नायब तहसिलदार, सितारामजी पवार सरपंच, डाँ. देवरावभाऊ राठोड, महादेवराव राठोड, प्रा. राजुभाऊ जी. आडे, प्रा. के. जी. चव्हाण, प्राचार्य, टी. व्ही. राठोड, गोपीचंदजी पवार से.नि.C.O., सुभाषभाऊ जाधव से.नि.PSI, विष्णुभाऊ आडे से.नि. PSI, प्रा. मदनभाऊ जाधव कारंजा तांडा कारभारी, प्रकाशभाऊ डी. राठोड, एस.एस. चव्हाण, प्रकाश एस. राठोड जिल्हाध्यक्ष गोर सेना, प्रा. राधाकिसन आ आडे, जि.बि. राठोड, पवन ही. राठोड, संतोष पवार, किसन जी. आडे, प्रा. सुनिल एन. राठोड इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.
Social Plugin