अलिबाग (रत्नाकर पाटील)
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग यांच्या वतीने टी टी पाटील विद्यामंदिर तीनविरा येथे विधी साक्षरता, जनजागृती शिबीर संपन्न झाला. कार्यक्रमांची सुरवात दिपप्रज्वलन सरस्वती पूजनाने तसेच विद्यार्थ्यांनी ईश स्तवन व स्वागत गीत गाऊन झाली. शाळेच्या वतीनी मुख्याध्यापक श्री तातरे सरांनी मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमती तेजस्विनी निराळे उपस्थित होत्या.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे कायम गोरगरिबांच्या हितासाठी काम करते तसेच आपल्याला आपल्या शाळेला लागणाऱ्या कायदेशीर गोष्टी आम्ही सातत्याने तुम्हाला पुरवू व या सुंदर अशा कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल त्यांनी शाळेचे अभिनंदन केले.तसेच पॅनल वकील अँड.मनीषा नागावकर यांनी गुड टच बॅड टच,पास्को कायद्याची माहिती तसेच बालकांचे हक्क यांची माहिती दिली. विधी स्वयंसेवक रुपेश पाटील यांनी विधी सेवा कार्य या विषयी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला 5वी ते 10 वी चे विद्यार्थी उपस्थित होते. विनोद तांडेल यानी सूत्रसंचालन केले, तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हेमंत भगत , सौ, नलिनी भगत तसेच तसेच सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Social Plugin