Ticker

6/recent/ticker-posts

शेख शरीफाबी शादुला यांचे दुःखद निधन



  देगलूर शहरातील बंडागल्ली येथील रहिवाशी ज्येष्ठ महिला शेख शरीफाबी शादुला यांचे वयाच्या 74 व्या वर्षी 27 जून रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जावेद अहेमद यांचे आजी होत्या. तर मुंबई येथे कार्यरत असलेल्या पोस्ट कर्मचारी शेख सलीमाबी जावेद यांच्या आजी सासू होत्या.28 जून रोजी दुपारी 1-30 वाजता नरंगल रोड येथील कबरस्तानात दफन विधी करण्यात आले. त्यांच्या पश्चात 3 मुले, 3 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.