Ticker

6/recent/ticker-posts

वाडगाव येथे प्रायमरी इंग्रजी शाळेचा शुभारंभासह; विदयार्थ्याना मोफत वहया वाटप, वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात



अलिबाग(रत्नाकर पाटील)

 अलिबाग नजीक वाडगाव येथे बापदेव सामाजीक सेवाभावी संस्था वाडगाव व वाडगाव ग्रा.प. सहकार्याने नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रायमरी इंग्रजी शाळेच्या शुभारंभासह विदयार्थ्याना मोफत वहया वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. 

वाडगाव राजिप शाळा येथे मंगळवार दि. 10 जुन रोजी सकाळी अकरा वाजता प्रायमरी इंग्रजी शाळेचा शुभारंभ कार्यक्रमासह वाडगाव मधील सर्वच विदयार्थ्याना मोफत वहया वाटप, तसेच वाडगाव राजिप शाळा व वैकुठ धाम परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. वाडगाव राजिप शाळेच्या समोरील सभागृहात आयोजीत कार्यक्रमास प्रायमरी इंग्रजी शाळेचे उद‍्धाटक सरपंच सारिका गणेश पवार व रा.कॉ. अलिबाग तालुका अध्यक्ष व उपसरपंच जयेंद्र का. भगत यांच्यासह प्रमुख अतिथी अलिबाग पं.स.गटशिक्षण अधिकारी सुनिल गवळी,जि.प. रायगड उपशिक्षणाधिकारी सुनिल भोपळे तसेच हितचिंतक नरेंद्र गोंखले,समाजसेवक मंगेश नाईक, वाडगाव राजिप शाळा मुख्याधिपिका सुगंधा पाटील, माजी सरपंच सरिता भगत, वाडगाव ग्रा.प. अधिकारी सोनाली पाटील, वाडगाव ग्रा.प.सदस्य व सदस्या आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मोठया  संख्येने विदयार्थीवर्ग व पालकवर्ग तसेच ग्रामस्थ वाडगाव यांची उपस्थिती होती. 

प्रारंभी बापदेव सामाजीक सेवाभावी संस्था वाडगाव व वाडगाव ग्रा.प. सहकार्याने नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रायमरी इंग्रजी शाळेचा शुभारंभ रा.कॉ. अलिबाग तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत  व माजी सरपंच सरिता भगत यांचे हस्ते फित कापून करण्यात आला. त्यानंतर  वाडगाव राजिप शाळेच्या समोरील सभागृहात मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन, मान्यवरांचे  स्वागत, सत्कार व विदयार्थ्याना मोफत वहया वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाडगाव ग्रा.प.उपसरपंच जयेंद्र भगत यांनी भुषविले. यावेळी बापदेव सामाजीक सेवाभावी संस्था वाडगाव वतीने उपस्थित मान्यवर सरपंच सारिका पवार, उपसरपंच जयेंद्र भगत व प्रमुख अतिथी पं.स.गटशिक्षण अधिकारी सुनिल गवळी,जि.प. रायगड उपशिक्षणाधिकारी सुनिल भोपळे, नरेंद गोखळे, मंगेश नाईक, व मुख्याधिपिका सुंगधा पाटील आदी मान्यवरांचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. यावेळी सुनिल गवळी, सुनिल भोपाळे,नरेंद्र गोखळे, मंगेश नाईक, सुंगधा पाटील, उपसरपंच जयेंद्र भगत आदीने मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल थळे, प्रास्ताविक नितिन पाटील,आभार रमेश भगत यांनी व्यक्‍त केले. 

त्यानंतर उपस्थित वाडगाव मधील सर्व विदयार्थीवर्गास रा.कॉ. तालुका अध्यक्ष तथा वाडगाव ग्रा.प. उपसरपंच जयेंद्र भगत यांचे वतीने मोफत वहया वाटप करण्यात आल्या. तसेच कार्यक्रमाचे शेवटी वाडगाव राजिप शाळा प्रांगणात सर्व मान्यवरांचे उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वाडगाव वैकुंठ धाम परिसरात कंदब, कनेर, करंज, बांबू, जांभूळ, आवळा, भाहवा, कडूलिंब आदी 500 वृक्ष रोपटयांचे  वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापदेव सामाजीक सेवाभावी संस्था, वाडगाव यांचे वतीने अध्यक्ष रमेश भगत,उपाध्यक्ष प्रदिप आंग्रे, सचिव प्रभाकर भगत,खजिनदार नंदकुमार थळे, सदस्य भास्कर भगत,शंकर गोविंद पाटील,केशव पाटील, मधुकर थळे, गणपत पवार, दिलिप ठाकूर, जयराम पाटील तसेच वाडगाव राजिळप शाळा मुख्याध्यापक सुंगधा पाटील,शिक्षक चंद्रकांत काटकर, नितिन पाटील, प्रशांत घरत, संध्या कडू, संतोष भगत आदीने विशेष परिश्रम घेतले.