एन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया चा उपक्रम
अलिबाग (रत्नाकर पाटील)
एन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बॅंक, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने परीसरातील शेतकऱ्यांसाठी "कृषी मार्गदर्शन सेमिनार - २०२५" चे आयोजन मंगळवार दि. १०/०६/२०२५ रोजी अलिबाग येथे करण्यात आले होते.
या सेमिनारमध्ये परीसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना आधुनिक तंत्रज्ञान, अर्थसहाय्य, अनुदान, उपक्रम इ. गोष्टींची परीपूर्ण माहिती मिळाली. यामध्येपंजाब नॅशनल बॅंक अधिकारीअविनाश नानासाहेब आळते - बॅंक मॅनेजर अलिबाग शाखा,
अजय कुमार तिब्रेवाल - सर्कलहेड ठाणे,कीर्तीकुमार ठाकरे - एमएसएमई प्रमुख, पीएलपी ठाणे, तन्मय अरविंद भगत - तालुका कृषी अधिकारी
मोहन सूर्यवंशी - कृषि पर्यवेक्षक,धनंजय प्रभाकर म्हात्रे - राष्ट्रीय मुख्य सचिव (एन्टी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया)यांनी मार्गदर्शन केले.
तसेच याप्रसंगी आपल्या फाऊंडेशनच्या वतीने सर्व उपस्थितीतांना सत्यनिष्ठेची शपथ देऊन त्याचे वैयक्तिक आयुष्यात पालन करण्यासाठी प्रोत्साहित केले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन एन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या रायगड टिमने केले, यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाची संकल्पना व मार्गदर्शन धनंजय म्हात्रे - नॅशनल चिफ सेक्रेटरी यांचे होते.
Social Plugin