नाशिक, प्रतिनिधि ,अमन शेख ,
सावकाराकडून घेतलेले २० लाखांचे कर्ज फेडण्याकरीता माहेरहून पैसे आणावे, असा तगादा लावत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कल्याण येथील पती, सासू, सासरे व नणंदेविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित विवाहीतेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे २०२० मध्ये लग्न झाले आहे. लग्नाच्या काही दिवसांत पतीने तू आमच्या लायकीची नाही, असे हिणवत, उपाशी ठेवत शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच आमच्यावर स्थानिक सावकाराचे १५ ते २० लाख कर्ज आहे. ते फेडण्याकरीता माहेरहून पैसे घेऊन ये, अशी कुरापत काढून छळ केला. याप्रकरणी पती, सासू, नणंद यांच्याविरोधात उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Social Plugin