Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा आगाराला पाच नवीन बस दाखल



कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे 

कारंजा लाड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या येथील आगाराच्या ताफ्यात २३ जुलै रोजी पुन्हा पाच नवीन आधुनिक लालपरी बस दाखल झाल्या आहेत. आमदार सईताई डहाके यांनी यासाठी शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला असून, यानिमित्ताने कारंजा आगारातील गाड्यांची संख्या आता ३६ वरून ४१ वर पोहचली आहे.

येथील एस. टी. बस आगारात १ एप्रिल रोजी अत्याधुनिक नवीन पाच लालपरी बसेस दाखल झाल्या होत्या. यावेळी आमदार सईताई डहाके यांनी जनतेच्या सोयीसाठी आणखी नवीन पाच बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. या आश्वासनाची पूर्तता करताना २३ जुलै रोजी त्यांनी कारंजा आगाराच्या ताफ्यात आणखी पाच नवीन बस दाखल करून घेतल्या असून, त्यांनी त्याचे रीतसर लोकार्पण केले. तत्पूर्वी, या अनुषंगाने स्थानिक एस. टी. बसस्थानकात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सईताई आ. सईताई डहाके यांनी बसमधून मारला फेरफटका एस. टी. बसमध्ये खासदार, आमदार यांच्यासाठी जागा आरक्षित असते. पण हे लोकप्रतिनिधी कधी बसमधून प्रवास करताना आढळून येत नाही. परंतु, कारंजा आगारातील नवीन बसचे उ‌द्घाटन कार्यक्रमाला उपस्थित आमदार सईताई डहाके यांनी बसमध्ये बसून फेरफटका मारला. त्याच्यासोबत इतरांनीही प्रवास केला. खुद्द आमदार एस. टी. बसमधून प्रवास करत असल्याचे पाहून उपस्थित प्रवाशांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

डहाके तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, आगार व्यवस्थापक रवीन्द्र मोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय लाहे व अमोल ठाकरे, माजी तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे, प्रा. सुधीर लुंगे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या स्वागत आणि सत्कारानंतर नवीन लालपरी फीत कापून जनसेवेत रुजू करण्यात आली. सूत्रसंचलन आगाराचे लिपीक संदीप ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाला माजी नगरसेवक नितीन गढवाले, आगाराचे कर्मचारी संजय भिवकर, मीर हुसेन अली, लेखाकार प्रफुल खंदारे, विवेक अलोने, वाहतूक निरीक्षक गंगा आंबटपूरे, देवेंद्र मोहाडे, सुहास राठोड, वर्षा भुसाटे गणेश घाटे यांच्यासह कारंजा आगाराचे इतर कर्मचारी व प्रवासी बहुसंख्येने उपस्थित होते.