सावली प्रतिनिधी रोशन बोरकर
सावली आणि व्याहाड खुर्द येथे रात्र पाळीला गुरख्याचे काम करणारा युवक अनिल विश्वकर्मा वय ३२ वर्ष हा दिनांक २३ ला रात्रौ साळे सातच्या दरम्यान व्याहाड खुर्द वरून सावलीला येत असतांना चंद्रपूर - गडचिरोली मुख्य मार्गावरील टोल नाक्याजवळ धाब्या जवळ उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, मृत्यूची बातमी कळताच परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर ट्रक क्रमांक CG 08 AV 0811 या नादुरुस्त असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH 34 CA 6585 या दुचाकी चालविणारा अनिल विश्वकर्मा याला पावसामुळे समोरील ट्रक न दिसल्याने त्यावर धडकला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला, घटनेची माहिती सावली पोलिसांना कळताच घटनास्थळी पोहचून त्याचा मृतदेह सावली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
त्याला पत्नी, दोन लहान मुली आणि एक मुलगा असून कुटुंबातील कमावता आधार गेल्याने अनेकजण हळहळ व्यक्त करीत आहेत.
Social Plugin