Ticker

6/recent/ticker-posts

बेलूर खू येथे स्वच्छता आणि आरोग्य जनजागृती शिबिर संपन्न.






धर्माबाद- २३ जुलै २०२५, बुधवार रोजी बेलूर खू/जाफलापूर येथे स्वच्छता आणि आरोग्य जनजागृती शिबिर उत्साहात पार पडले. इंडो ग्लोबल सोशल सर्विस सोसायटी, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत बेलूर खू/जाफलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात गावकऱ्यांना आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले, तसेच त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. 

             यावेळी सरपंच प्रतिभा कांबळे, उपसरपंच पोतन्ना बोडकेकर, सदस्य पांडुरंग सूर्यवंशी, आबांन्ना गंगनेलु, संतोष जाधव, राम कांबळे, लालु पांचाळ, बळीराम सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती. आरोग्य अधिकाऱ्यांकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन शिबिराच्या सुरुवातीला, आरोग्य विभागाच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती भालेराव, डॉ. कल्पना काळे, त्र्यंबक जेठेवार आणि धनंजय बसवंते यांनी उपस्थितांना आरोग्य आणि स्वच्छतेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विविध आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याची गरज यावर भर दिला. यासोबतच, अनेक गावकऱ्यांची सामान्य आरोग्य तपासणीही यावेळी करण्यात आली.

स्वच्छ गावाचे महत्त्व पटवून दिले  इंडो ग्लोबल सोशल सर्विस सोसायटीचे प्रकल्प समन्वयक अक्षय श्रीकंठवार, गोविंद खुळखुळे, संगीता भालेराव आणि फिरोज शेख यांनी गाव स्वच्छतेचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले. स्वच्छ गावामुळे आरोग्य कसे सुधारते आणि विविध साथीचे रोग कसे टाळता येतात, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.  आशा वर्कर पंचशीला कांबळे, अंगणवाडी सेविका प्रतिभा भोईवार, ललिता कुद्रुकर, ज्योती उस्किलवार,  हनमंत गंगनेलु यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष प्रयत्न केले.

            संयोजकांनी सांगितले की, या शिबिरामुळे बेलूर खू येथील गावकऱ्यांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली आहे. भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.