बाळासाहेब पवार प्रतिनिधी
राज्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेमध्ये नुकतीच ऐतिहासिक युती जाहीर करण्यात आली असून, याचा जल्लोष उमरखेड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फटाके फोडून आणि मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. या युतीची अधिकृत घोषणा शिवसेना नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे नेते माननीय आनंदराज आंबेडकर यांनी बुधवार, दिनांक १६ जुलै २०२५ रोजी मुंबईत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या युतीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा आता नव्या राजकीय समीकरणांच्या उंबरठ्यावर उभा आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व महानगरपालिका निवडणुकांमध्ये या युतीमुळे मोठे राजकीय चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड आणि रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर हे दोघेही लोकप्रिय, प्रभावी आणि सक्रिय नेते म्हणून परिचित असून, त्यांचे एकत्र येणे हे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा वाढवणारे ठरत आहे.
सुनील चिंचोलकर हे दलित समाजाच्या हक्कांसाठी नेहमीच आक्रमक पवित्रा घेत असून, संजय राठोड यांचे सामाजिक कार्य आणि गोरगरिबांसाठी असलेली सहानुभूती महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.उमरखेड शहरात झालेल्या आनंदोत्सवात शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थित प्रमुख मान्यवर:
शिवसेना:जिल्हा सहसंपर्कप्रमुख चितांगराव कदम,तालुका प्रमुख प्रविण पाटील मिराशे, कपिल पाटील, शहरप्रमुख अॅड. संजीवकुमार जाधव,माजी उपजिल्हाप्रमुख कैलास कदम,उपशहरप्रमुख बसवेश्वर क्षीरसागर,संदीप ठाकरे, गजानन सोळंके, राजू गायकवाड, वसंत देशमुख, दामोदर इंगोले,युवा सेना प्रतिनिधी सचिन दवणे, देवबन गोसावी,महिला आघाडी शहरप्रमुख सपना चौधरी.रिपब्लिकन सेना: जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर,तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे, शहराध्यक्ष सिद्धोधन दिवेकर, उपाध्यक्ष भीमराव खंदारे, गजानन भोयर, भाऊराव भोयर, राहुल नवसागरे, नंदू इतकरे, संदीप राऊत, देवराज गोडबोले, साहेबराव कदम, माधव मेळेगावकर, कुंदन कदम, हजान नवसागरे, प्रकाश पोपलवाड, विष्णू काळबांडे.
या एकत्र येण्यामुळे स्थानिक राजकारणात मोठा फेरबदल अपेक्षित असून, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीत या युतीमुळे मतविभाजन थांबून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Social Plugin