Ticker

6/recent/ticker-posts

जाफराबाद तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर- अनेकांचे स्वप्नभंग.



टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर 

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यांतील ग्रामपंचायतिची आरक्षण सोडत दिनांक १४जुलै रोजी जाहीर करण्यात आली आहे सरपंच पदाचे स्वप्न पहात गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या  अनेकांचा आरक्षण जाहीर जाहीर झाल्यानंतर हिरमोड झाला राजकीय राजनितिवर पाणी फेरल्या गेले.मात्र काही  जणांचे मनासारखे आरक्षण निघाल्याने त्यांच्या साठी हे आरक्षण सोण्यहून पिवळे ठरले. थेट जनतेतून सरपंच जात असल्याने इच्छुकांनी तैयारी चालवली होती व संपर्क ही वाढवला होता त्यामुळे काय आरक्षण निघते, याकडे गावागावाचे लक्ष लागले होते. जाफराबाद तालुक्यांतील  ७२ सरपंच पदाचे आरक्षण जाफराबाद तालुक्यांतील ७२ सरपंच व महिला सरपंच पदाचे आरक्षण  उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, तहसीलदार सारिका भगत, नायब तहसीलदार गणेश मिसाळ, मंगेश साबळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले.

यावेळी संजय खांडेभराड, सतिश वाघ, गौतम गवई,  यांच्या सह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते उपस्थित होते.   

       सुशांत अनिल चुंगडा या लहान मुलांच्या हाताने चिठ काढण्यात आली,ज्यामध्ये सर्वसाधारण सरपंच पदाचे आरक्षण ग्रामपंचायत हिवराबळी, कोनड बु. ,जानेफळ, अकोला देव ,आसई ,दहिगाव, पापळ,पोखरी ,विरखेडा भालकी, टाकळी ,सावंगी ,वरुड खुर्द, हनुमंत खेडा,निवडुंगा ,घाणखेडा, कुंभारी, कुंभारझरी ,आरतखेडा तर सर्वसाधारण महिला सरपंच पदाच्या आरक्षण असलेल्या ग्रामपंचायती कोल्हापूर ,सिंधी, डोणगाव ,नळविहीरा ,सावरखेडा गोंधन, सातेफळ ,भराडखेडा, खापरखेडा ,बुटखेडा ,वरखेडा वीरो ,काळेगाव ,बोरगाव बु., चापनेर, देऊळझरी, देऊळगाव उगले ,बेलोरा, मंगरूळ,तर नागरिकाचा मागास प्रवर्ग ज्यामध्ये आळंद, सांजोळ, पासोडी, वरुड बुद्रुक ,शिराळा, तपोवन ,सावरगाव मस्के, येवता, टेंभुर्णी,तर नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला साठी असलेल्या ग्रामपंचायती यामध्ये डावरगाव, पिंपळगावकड,नांदखेडा ,ब्रह्मपुरी ,वानखेडा,देवळेगव्हाण,जवखेडा , माहोरा, भारज बु ,भातोडी,तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सरपंच पदाच्या आरक्षण ज्यामध्ये मेरखेडा ,सोनगिरी, आडा, तोंडोळी ,म्हसरूळ, चिंचखेडा ,भारजखुर्द,तरअनुसूचित जाती महिला प्रवर्ग ज्यामध्ये खासगाव, गोंधनखेडा, हिवराकाबली, डोलखेडा खुर्द, आंबेगाव, खानापूर,तर अनुसूचित जमाती ज्यामध्ये पुरुष प्रवर्ग कोळेगाव आणि महिलांसाठी आरक्षित अनुसूचित जमाती निमखेडा बु.अशा पद्धतीने ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.