प्रतिनिधी - जावेद अहेमद
देगलूर तालुक्यातील खानापूर येथील शेख आयेशा मोहम्मद गौसहिची ब्रहणमुंबई महानगरपालिका बीएमसी येथे कार्यकारी सहाय्यक एक्झिटिव्ह असिस्टंट या पदासाठी निवड झाली कुमारी आयेशा यांचे प्राथमिक शिक्षण साधना हायस्कूल देगलूर येथे झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण देगलूर महाविद्यालय देगलूर येथे झाले. कु. आयेशा शेख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून, शिका संघटित व संघर्ष करा, तसेच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, तसेच सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार देऊन खऱ्या अर्थाने महिला पुढे गेली पाहिजे .
शेख फातिमा बी यांचे विचार अंगिकारून शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे विचार घेऊन कुमारी आयेशा शेख त्यांनी स्पर्धा परीक्षेकडे वळले त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कर्मवीर क्लासेस लातूर येथून केली ते स्वत उच्च शिक्षीत पदवीधर शिक्षण अर्थात एम एस सी बी एड त्यांचे उच्च शिक्षण असून, ते स्पर्धा परीक्षेतून मुंबई येथील महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक या पदासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल देगलूर येथील बौद्ध समाजातर्फे त्यांच्या राहत्या घरी भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी कुमारी आयेशा शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माझे आयडियल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले व शेख फातिमा बी त्या आहेत .यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघन दादा वाघमारे, प्रा. डॉ.भीमराव माळगे सर, प्रा.अभिनंदन सिताफुले प्रा. मिलिंद राजूरकर, मिलिंद कावळगांवकर प्रदेश सचिव सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस, आनंद राजुरे जिल्हाध्यक्ष रासपा नांदेड, माईंड लाईट चे संपादक मिलिंद वाघमारे, श्री शेख सर, प्रा.भीमराव दिपके. यावेळी उपस्थित होते
Social Plugin