बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
मौजे चिकना फाटा ता. धर्माबाद येथे बिलोली आगाराची एस.टी. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून एकाच मृत्यु तर विद्यार्थी, महिला आणि नागरिक जखमी झाले..ही अत्यंत गंभीर व दुःखद घटना
बिलोली आगाराचीगाडी न.MH 20 BL352 ही बस धर्माबादकडे जात असताना चिकना फाटा येथे कार आणि बसचा अपघात झाला. यामध्ये अनेक विद्यार्थी प्रवास करीत होते. विद्यार्थी व जेष्ठ नागरिक या मध्ये जखमी झाले असता त्यांना धर्माबाद येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आले यावेळी अपघातग्रस्ताच्या तब्येतीची विचारपूस केली उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमींची माहिती घेतली व धर्माबाद पोलीस निरीक्षक साहेबांना घटनेचा तात्काळ पंचनामा करा अशा सूचना दिल्या.
Social Plugin