अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जय भोले मित्र मंडळातर्फे अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.यात्रा पूर्ण करून सर्व भाविक भक्त सुखरूप परतले आहे.यावर्षी जय भोले मित्र मंडळाचे हे २० वे वर्ष आहे त्यानिमित्त जय भोले मित्र मंडळातर्फे विशाल रक्तदान शिबिर व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी या रक्तदान शिबिरामध्ये सर्व भाविकांनी सहभाग घेऊन आपण रक्तदान करावे व भंडाऱ्यामध्येही महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मनित कक्कड यांनी केले आहे.
रक्तदान शिबीर हे शनिवार दि२६जुलै रोजी सकाळी ११ते ०५ या वेळेत होईल व भंडारा रविवार दि २७ जुलै सकाळी ११ ते ०५ या रोजी खेडकर मंगल कार्यालय शनी मंदिर जवळ जुना जालना येथे ठेवण्यात आलेला आहे.रक्तदान व भंडारा आयोजन कुलदीपराज कक्कड,शरद बारसे,विजय मोहिते,रवींद्र जगदाळे,शरद तनपुरे,शाम वाघमारे डॉ.राज रणधीर,गणेश वीसनगरकर,पंकज हुंबे, कुणाल टाक,कुणाल शिनगारे,पंकज साळवे,संकेत पाटील,कन्हैयालाल अवघड,सदाशिव टापरे,रमेश गायकवाड,गोपाल डोंबरे,दत्तात्रय अडाणी आदी जण परीश्रम घेत आहे..
Social Plugin