Ticker

6/recent/ticker-posts

घोटी खुर्द, रोंगटेवाडी परीसरात चोरट्यांचा सुळसुळाट, चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी.



कवडदरा प्रतिनिधी : अनिल मल्हारी निसरड. 

इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द/ रोंगटेवाडी परिसरात गेली पाच ते सहा दिवसांपासून रात्रीच्या वेळी सतत शेतातील वस्तीवर चोर येत आहेत. चोरट्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोर हे रानावनातील घरांना झोपड्यांना मुख्य लक्ष करतात. त्यांच्या चोरीचा प्रकार दरवाजे वाजवून घरात घुसण्याचा किंवा  घराबाहेरील उभ्या गाड्या चोरण्याचा असतो. रोंगटेवाडी परिसरात दोन ते चार वेळा असे प्रकार घडले आहेत.तशी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची नुकसान झाली नाही. 

  अशी परिस्थिती असताना गेली चार दिवसांपासून चोर पकडण्यासाठी पहाटेपर्यंत पहारा देण्यासाठी गणेश भाऊ रोंगटे, जनार्दन भाऊ निसरड,सुरेश भाऊ रोंगटे,हिरामण भाऊ निसरड, तुकाराम भाऊ रोंगटे,भिमा रोंगटे,अर्जुन रोंगटे,वाळु रोंगटे,सखाराम रोंगटे,जनार्दन भोईर,श्याम रोंगटे,दिनकर रोंगटे,स्वप्नील रोंगटे,विश्वास निसरड,साईनाथ रोंगटे, अक्षय निसरड,नाना डमाळे,कृष्णा कुल्लाळ,आदींनी ग्राम रक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. तरी देखील नागरिकांनी सावधानता बाळगावी, 

रात्री घरांच्या मुख्य दरवाजे कुलुप लावून बंद करावे. बाहेरगावी जातांना बंद घरात पैसे, सोने-चांदीचे दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू ठेवून जावू नये ते बँक लॉकर किंवा इतर सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. वाडीतील किंवा परिसरातील नागरीकांनी पुढाकार घेवून लोक सहभागातून मोक्याच्या ठिकाणी सी.सी.टि.व्ही. कॅमेरे बसवावे, तसेच ग्राम सुरक्षा रक्षक नेमावे. दिवसा किंवा रात्री संशयित हालचाल किंवा घटना जाणवल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे.मोटार सायकल निर्जन स्थळी तसेच मैदान, बाग अशा ठिकाणी पार्क करणे टाळावे. मोटार सायकलला व्हिल लॉक बसविण्यात यावे.रहदारीच्या रस्त्यावर किंवा निर्जनस्थळी मोबाईल फोनवर बोलणे टाळावे. किमती वस्तू एखाद्या गोडावून किंवा वर्दळ नसलेल्या घरात ठेवल्या असल्यास सुरक्षितेबाबत काळजी घ्यावी.

पोलीस गस्त, बंदोबस्त करुन गुन्हे प्रतिबंध तसेच उघड करतीलच परंतू एक जबाबदार नागरीक म्हणून सतर्क राहणे तेवढेच महत्वाचे..!


*घरात व परिसरात घरफोडी, जबरी चोरी,मोटार सायकल चोरी इतर प्रकारची चोरी होवू नये म्हणुन नागरीकांनी खालील सूचनांचे पालन करून सतर्क रहावे.*

*अशा सूचना पोलीस निरीक्षक, वाडीवऱ्हे पोलीस ठाणे यांनी नागरिकांना दिल्या.*

सद्ध्या रोंगटेवाडी परीसरात गेली पाच ते सहा दिवसांपासून रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत चोरट्यांचे चोरीचे प्रमाण वाढले आहे तरी नागरिकांनी सर्तक राहवे.घरांचे दरवाजे कुलूप लावून बंद करावे,आनोळख्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडू नये.लवकरच ग्रामसुरक्षा रक्षक कमिटी स्थापन करू,तसे पोलीस प्रशासनाला लेखी तक्रार केली आहे.कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. लवकरच याचा बंदोबस्त होईल. -सामाजिक कार्यकर्ते, गणेश भाऊ रोंगटे.---