लाखांदूर तालुका विरली (बु.) येथे
महसुल सप्ताह अंतर्गत मौजा विरली / बु. येथे दिनांक – 04/08/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले. तसेच इतर मंडळामध्ये सुध्दा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबीराचे ठिकाणी मा. श्री. राजेंद्र जाधव, अपर जिल्हाधिकारी भंडारा यांनी विरली / बु. येथे सकाळी 10.00 वाजता समाधान शिबीराला भेट देवुन जास्तीत जास्त संख्येने जनतेने शिबीराचा लाभ घेणे करीता संबोधित केले व शेतक-यांना 7/12 व ईतर प्रमाणपत्र वाटप केले. त्यावेळी श्रीमती रसिका रंगारी, जि. प. सदस्य व श्रीमती महावाडे, सरंपच, विरली बु. हे. सदर कार्यक्रमात उपस्थित होते. श्री. वैभव पवार, तहसिलदार लाखांदूर यांनी महसुल सप्ताह निमित्याने जनतेला जास्तीत - जास्त संख्येने शिबिराचा लाभ घेण्याकरीता आवाहन केले व महुसल सप्ताहाची रुपरेषा जनतेला सांगीतली.
सदर शिबिरामध्ये लाखांदूर तालुक्यातील जनतेला विविध दाखले, प्रमाणपत्र व शासकीय योजनांचा लाभ देण्याकरीता तालुक्यातील वेग - वेगळया विभागामार्फत जनतेला विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र व सेवांचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये सेतु अंतर्गत 36, आधारकार्ड केंद्राद्वारे 45, निवडणुक शाखेकडुन 11, अन्न व पुरवठा शाखेकडुन 37, उपअधिक्षक भुमि अभिलेख – 61, तालुका कृषी विभागाकडुन 32, ग्राम महसुल अधिकारी 32 संगायो / इंगायो 56 यांचे कडुन उत्पन्न दाखले ईत्यादी विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र, ऑनलाईन सेवा पुरविण्यात आल्या. सदर शिबीराला लाखांदूर तालुक्यातील विरली /बु. येथील रहिवासी नागरीकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला व 310 नागरीकांनी शिबीरात लाभ घेतला. सदर शिबीर यशस्वी करण्याकरीता श्री. वैभव पवार, तहसिलदार लाखांदूर यांचे मार्गदर्शनात श्री. ए. आर. पवार, श्री. ङि के. धकाते, नायब तहसिलदार, श्री. आर. एस. गेडाम, स. म. अ. श्री. शैलेश उपासे, मंडळ अधिकारी ईतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
------------------------------------
लाखांदूर तालुका प्रतिनिधी साजन बोकडे
Social Plugin