प्रतिनिधि:- उत्तम पाईकराव
हिमायतनगर शहरांमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट असून गेल्या बुधवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अँड्रॉइड मोबाईलची चोरी झाली होती. असे असताना आज बुधवारी पोळ्याचा सण असताना देखील पोलिसांनी आठवडी बाजारात गस्त ठेवली नाही दरम्यान याच गर्दीचा फायदा घेत आज दुपारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर उभ्या असलेल्या एका खातेदाराची दुचाकी भर दिवसा आज्ञा चोरट्यांनी चोरून नेले याबाबत विनोद परसराम जाधव यासंबंधीत व्यक्तीने हिमायतनगर पोलिसांना सूचना दिली असून दुचाकी चोरट्याला पकडण्यात पोलिसांना कितपत येशील हे पहावे लागणार आहेत दुचाकी चोरून नेतानाचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलिसांनी फुटेजची पाहणी करून तपास सुरू केला असला तरी हिमायतनगर पोलीस सीसीटीव्ही फुटेज मधील चोरट्याच्या मुस्क्या आवडतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Social Plugin