अमोल शितळे @प्रतिनिधी
नांदेड – नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यात पार पडण्याची शक्यता असून, यासंदर्भात तयारी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महानगरपालिकेचा कार्यकाल संपल्यानंतर प्रशासकाच्या माध्यमातून शहराचा कारभार सुरू आहे. मात्र निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
राजकीय पक्षांनीही आतापासून रणनीती आखायला सुरुवात केली असून, इच्छुक उमेदवारांकडून प्रचाराची तयारी सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Social Plugin