Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगाव सुवर्णनगरीतील जनतेचा विश्वास – पोलिसांच्या सेवेमुळे पुन्हा झळकली ओळख



बुध   दि [प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेगाव हे शहर प.पू.श्री.सेवागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी आहे.या सुवर्णंनगरीतील पुसेगाव पोलीस  ठाणे हे महाराष्ट्र मध्ये सलग दोन वेळा महाराष्ट्रात व सातारा जिल्ह्यात पहिल्या क्रमांक वर आहे. सुनील फुलारी साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन या पोलीस ठाणे च्या कामकाजाचा गौरव केला होता.महाराष्ट्र राज्यात पुसेगाव पोलीस स्टेशनचा सलग 2 वेळा डंका वाजला आहे.

नूतन पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक Dr वैशाली कडुकर मॅडम,उप विभागीय पोलीस अधिकारी श्री .अजित टिके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री.संदीप पोमन  व त्यांचा सर्व स्टाफ यांनी हद्दीतीलचोरी,दरोडा,घरफोडी,खुनाचा प्रयत्न,गंभीर दुखापत,बेकायदा जमाव जमवून मारहाण,खुणासाठी खंडणी,गोरगरीबांची   फसवणूक,लुटमार यासारखे अनेक गुन्हे करनाऱ्या गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.शाळा,कॉलेज परिसर मधील रोड रोमिओ यांना पोलीस खाक्या दाखवत उल्लेखनीय कामकाज केले आहे.पुसेगाव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री संदीप पोमन  यांनी या कामात मोलाचा वाटा उचलला .गोरगरिब, पीडित, असाह्य महिला व पुरुष यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुसेगाव पोलिस ठाण्याने गेल्या काही वर्षांपासून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला पोलिस अंमलदार अमृता चव्हाण  गेल्या सहा वर्षांपासून इमाने-इतबारे सेवा बजावत असून, त्यांच्या तत्परतेमुळे अनेक निराधारांना आधार मिळाला आहे.ऑनलाईन गुन्ह्यांपासून मोबाईल लोकेशनपर्यंत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्यांनी शेकडो हरवलेले मोबाईल, पैसे, पर्स शोधून गोरगरीबांना परत दिले आहेत. त्यामुळे चव्हाण मॅडम या संपूर्ण पोलीस खात्याला प्रेरणादायी ठरल्या आहेत.याशिवाय, पुसेगाव शहर सलग दोन वेळा महाराष्ट्र राज्यात झळकले, यात देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे.

गेल्या वर्षभरापासून पुसेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. संदीप पोमन यांनी गोरगरीबांच्या घरी जाऊन त्यांचे प्रश्न ऐकून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. नागरिकांच्या संकटाच्या क्षणी धावून जाणारा हा खरा लोकाभिमुख अधिकारी असल्याचे मत स्थानिकांमध्ये आहे.तसेच, नागरिकांच्या व्यथा नीट ऐकणारे व त्याना समजुंण घेणारे दप्तरी पोलिस हवालदार योगेश बागल व गोपनीय द-याबा नरळे हे देखील नागरिकांसाठी आशेचा किरण ठरले आहेत.पोलीस ठाणेस येणा-या प्रत्येक  तक्रारीची दखल घेत त्यांनी जनसामान्य जनतेला न्याय दिला आहे.जनतेच्या अशा सहकार्यामुळे व पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे पुसेगाव पोलिस ठाणे दोन वेळा महाराष्ट्रात नंबर वनवर झळकले आहे.

आज पुसेगाव सुवर्णनगरीत कार्यरत अधिकारी व सर्व अंमलदार यांच पुसेगाव नगरीतील नागरिक आणि श्री .सेवागिरी देवस्थान मध्ये येणारे भाविक तोंड भरून कौतुक करत आहेत.