कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे
कारंजा- तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शिवसेना कारंजा तालुक्याच्या वतीने तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्याकडे करण्यात आली
आमदार भावनाताई गवळी यांच्या आदेशाने व शिवसेना तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन तहसीलदार कार्यालयात देण्यात आले. तहसीलदार झाल्टे साहेब यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, 'शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभे आहे. शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील', असे आश्वासन दिले. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनोज पाटील दहातोंडे, उपतालुका प्रमुख मंगेश पाटील सावके, काजळेश्वर सर्कल प्रमुख संदीप पाटील लाहे, उपसर्कल प्रमुख उमेश पाटील लडे, सागर पाटील मुंदे, जानोरी सरपंच अमोल पाटील भिंगारे, महागाव सरपंच अरुण भाऊ चव्हाण, लोहगाव प्रकाश भाऊ आडे, डोंगरगाव सरपंच प्रमोद सातोटे, हिंगणवाडी सरपंच अंकुश पाटील भेंडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते
Social Plugin