लोहगाव प्रतिनिधी,:- सोमनाथ काळे
वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांची आम्ही भेट घेतली यावेळी श्री राजेंद्र खांदवे यांनी आमदारांना लोहगावच्या समस्या सांगितल्या त्यामध्ये लोहगावतील दोन्ही स्मशानभूमीची कामे त्वरित चालू करावी, लेक व्यू सिटी गणपती मंदिरा शेजारील धोक्याची डीपी ची जागा बदलण्यात यावी, पठारे वस्ती पाणी लाईन साठी एचपी ची परवानगी लवकर मिळावी, रस्त्यांचे कामे कॉन्ट्रॅक्टर करत नाहीत, काळभोर वस्ती ब्लू स्काय व इतरत्र मध्ये डीपी बसवण्यात यावी, प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे, हरण तळे व बी यु भंडारी पाण्याची टाकी सुरू करावी, नागरिकांना नळ कनेक्शन तात्काळ द्यावेत, संपवेल चा पंप सहा दिवसापासून बंद आहे त्यामुळे गावात काही भागात पाणी नाही,
सर्वे नंबर 68/3 हॉलमार्क सिटी व आश्रय सोसायटी मधील मैला पाण्याची गंभीर समस्या आहे, तेथे रस्त्यावरील आठवडे बाजारमुळे तेथील नागरिकांना त्रास होतो असे सांगितले यावेळी आमदारांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या व लवकरच त्याबाबत महानगरपालिकेमध्ये बैठक घ्यायचे ठरले आमदारांनी भरपूर वेळ दिला व लोहगाव चे प्रश्न सोडवत असल्याबद्दल प्रमुखांनी समाधान व्यक्त केले आपला राजेंद्र खांदवे अध्यक्ष राजेंद्र दादा खांदवे राष्ट्रसेवा फाउंडेशन उपाध्यक्ष रा काँ पार्टी पुणे
Social Plugin