Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड पोलीस बॅच मेट च्या वयीने सुभेदार नागनाथ बासरे यांचा सत्कार...



बिलोली तालुक्यातील मौजे आदमपूर येथील सेवानिवृत्त सुभेदार तथा नांदेड पोलीस शिपाई नागनाथ माणिकराव बासरे आदमपूरकर हे नुकतेच पोलीस दलातून ८ वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले होते.त्या निमित्त सन २०१७ सालातील 'नांदेड पोलीस बॅच' या पोलीस सहकारी कर्मचारीवर्गाच्या वतीने शिवाजीनगर नांदेड येथील अतिथी हाॅटेल सभागृहात बासरे दांपत्याचा भव्य सप्रेम भेट प्रदान करीत सन्मान करण्यात आला.भारतीय लष्करात ब्बल ३० वर्ष सेवा करीत सुभेदार पदावरून बासरे सन २०१७ साली निवृत्त झाले.

त्यानंतर त्यांची महाराष्ट्र पोलीस अंतर्गत नांदेड पोलीस दलात शिपाई म्हणून नेमणूक झाली.बासरे हे आपल्या ८ वर्षाच्या पोलीस सेवेत असताना नांदेड शहरातील स्थित राजकीय व प्रासंगिक नांदेड दौर्‍यावर अतिविशिष्ट आलेल्या महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तिमत्त्वांसह चोख सुरक्षा पुरविली.जिल्ह्यातील संवेदनशील प्रक्षेञात त्यांनी विशेष शांती प्रस्थापित केली.आपल्या पोलीस बॅच मेट कर्मचारीवर्गास वेळोवेळी सकारात्मक मार्गदर्शन ही केले.

कार्यक्रम निमित्ताने त्यांचे लष्करातील व पोलीस दलातील अनुभव त्यांनी कथन केले.प्रत्येकजण आपल्या सहकारीस निरोप देताना भावूक झाल्याचे चेहर्‍यावर  भाव झळकत होते.पोलीस दलातील पुरूष व महिला कर्मचारी,कुटुंबीय सदस्य,मिञांची उल्लेखनीय उपस्थिती होती.त्यानंतर अखेरीस सर्वांनी सुग्रास जेवण करीत सेवापूर्ती समारंभाचा समारोप करण्यात आला.