Ticker

6/recent/ticker-posts

आदमपूर परिसरात अतिवृष्टीचा तडाखा;ओहोळामुळे सोयाबीन पाण्यात



ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

बिलोली तालुक्यातील आदमपूर परिसरात रविवार  दि.२१ सप्टेंबर च्या मध्यरात्रीपासून विजांच्या तुफान कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने केरूर माळरानावरून वाहत येणाऱ्या आदमपूर गाव परिसरातील ओहोळ तुडुंब ओसंडून वाहत होता.यामुळे आदमपूर गावाजवळील पुलावरून जोरदार पाणी वाहत होते.त्यामुळे काहीकाळ रहदारी ठप्प झालेली होती.

प्रसंगी विजांचा कडकडाट एवढा जोराचा होता की लाईटही गुल झाली.शनिवार दि.२० सप्टेंबर रोजी आभाळात ढगांनी भरगच्च गर्दी केलेली होती.सकाळी नाल्याच्या आवाक्यातील सोयाबीन,तूर पिके पाण्याखाली गेल्याचे चिञ ह्रदयद्रावक असेच होते.काही उस लागवड शेतकर्‍यांच्या शेतातील उस पाण्याच्या प्रवाहामुळे आडवे पडले होते.पुलावरून पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमलेली होती.

यापूर्वीच्या अतिवृष्टीत मन्याड व त्या त्या गावांशेजारील नाल्यांमुळे हजारो हेक्टर सोयाबीन पीक पाण्यात बुडाले.गावोगावी परिसरातील व जिल्हाभरातील राजकीय लोकांचे तांडेच्या तांडे नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतात,बांधावर आले.भरघोस नुकसान मदतीची शाश्वती आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून निवेदनांचा पाऊस पडत राहिला.माञ,प्रत्यक्षात शेतकरीवर्गांस एकीकडे तुटपुंजी मदत सरकारने जाहीर करून बळीराजाची थट्टा चालविली आहे.असा आपदग्रस्त शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत होता.पुरपडी व नुकसान भरपाई शासनाने जेमतेम जाहीर केले असल्याने बळीराजा दिवाळीपूर्वी संकटात सापडण्याची चिन्हे होती.अजुनही सरकारने विचार करावा आणि भरीव मदत जाहीर करावी, अशी जनभावना उबळ घेत होती.