गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा तालुका, जिल्हा वाशिम (पोहा वितरण केंद्र):महावितरणच्या पोहा वितरण केंद्रांतर्गत येणाऱ्या मौजे काजळेश्वर व जानोरी येथील कृषी ग्राहकांनी महावितरणच्या तत्पर व जबाबदार सेवेसाठी समाधान व्यक्त केले आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना किरकोळ वीजपुरवठा अडचणी, जोडणीसंबंधी प्रश्न किंवा फॉल्ट निवारणासाठी आता शाखा कार्यालयात धाव घ्यावी लागत नाही. कनिष्ठ अभियंता श्री. फुलंब्रीकर साहेब व प्रधान तंत्रज्ञ श्री. प्रवीण मुंदे साहेब हे दोन्ही अधिकारी शेतकऱ्यांच्या तक्रारी थेट फोनवरूनच निवारण करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, खर्च आणि त्रास मोठ्या प्रमाणात वाचतो.मौजे काजळेश्वर व जानोरी येथील शेतकऱ्यांनी सांगितले
शेतकऱ्यांची प्रतिक्रिया....
“पूर्वी लहानसहान कामासाठी कार्यालयात जावे लागे, आता फोनवरच सांगितल्यावर लगेच निवारण होते. आम्हाला खूप सोय झाली आहे.खरच या दोघां अधिकाऱ्यांच्या सत्कार करण्यासारखे आहे कारण काही तर इंजनियर कॉल सुद्धा उचलत नाही आणि काही शेतकऱ्याकडून प्राव्हेट माणसे लावून कामे करून घेतात आणि त्याचे पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागतात त्यामुळे गरीब शेतकऱ्याचा निसर्ग पन साथ देत नाही आणि कर्मचारी पन साथ देत नाही त्यामुळे जर शेतकऱ्यांचे काम फोन च्या माध्यमातून होत असेल तर कोणत्याही शेतकऱ्यांना ऑफिस मध्ये यायचे काम पडणार नाही आणि खरंच याप्रमाणे जर काम केले तर शेतकऱ्यांच्या वतीने शिवसेने तर्फे सर्व भागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल असे मंगेश पाटील मुंदे शिवसेना तालुका प्रमुख कारंजा (शिंदे गट ) त्यांनी कळवले आहे.





Social Plugin