सेवाभावाचा संगम; गोपीनाथराव मुंढे साहेब जयंती व शरदचंद्र पवार साहेब वाढदिवसानिमित्त मलकापूर पांग्रा येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा :- तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे मा. माजी उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री लोकनेते गोपीनाथराव मुंढे साहेब यांच्या जयंतीनिमित्त तसेच मा. खासदार, नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लीलावती ब्लड बँक, बुलढाणा यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे ३५ ते ४० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले. गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले.
कार्यक्रमास सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर, डॉ. गजानन मुळे, ग्रामसेवक दानवे, डॉ. ठोसरे, पवार तसेच शंकर उगलमूगले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करून अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या उपक्रमासाठी प्रवीण जाधव, गोपाल केवट, दिपक नागरे, नवनीत डिघोळे, अमोल देशमुख यांनी विशेष सहकार्य केले.या सामाजिक उपक्रमातून तरुणांनी दाखवलेली एकजूट आणि सेवाभाव समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून, युवकांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.





Social Plugin