अकोट प्रतिनिधी : सैय्यद मज़हर अली
‘एक वर्ग असा ही’ उपक्रमांतर्गत PM SHRI नगर परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा क्र. ५ येथे मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांनी दुसऱ्यांदा भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबर यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि मेहनतीचे महत्त्व सांगितले. ‘NO’ म्हणजे ‘Next Opportunity’ असा संदेश देत अपयशातून संधी शोधण्याचे आवाहन केले. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत निवड झालेल्या माहिरा परवीन मोहम्मद खालिद हिचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच बालवाडीतील सुमारे ४० चिमुकल्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.





Social Plugin