दहावीसाठी १६८ केंद्र : शिक्षण विभागासह यंत्रणा सज्
नांदेड : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला १ मार्चपासून प्रारंभ होत असून, जिल्ह्यातील ४६ हजार ३८२ विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा कस लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने या परीक्षा घेतल्या जात आहेत. जिल्ह्यात २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला असून, १ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. एकूण १६८ परीक्षा केंद्र यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. यावर्षीही कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. त्यासाठी १६८ बैठे पथक स्थापन करण्यात आली आहेत. तसेच भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. ४६ हजार ३८२ परीक्षार्थी आजपासून परीक्षा देणार आहेत.
आज मराठी विषयाचा पेपर
■ पहिल्या दिवशी मराठी विषयाची परीक्षा होणार आहे. सकाळी ११:०० ते दुपारी २:०० असा परीक्षेचा वेळ असून, या कालावधीमध्ये परीक्षा केंद्र परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
■ कॉपीमुक्त्त वातावरणात परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात बारावी परीक्षेत काही परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे दहावीसाठी अधिकच खबरदारी घेतली जात आहे.





Social Plugin