Ticker

6/recent/ticker-posts

विशाल भोसले यांची सरचिटणीस पदी निवड

 


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]

  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए ) चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेश्याने, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब पवार, राज्य संघटक कैलास भाऊ जोगदंड, यांच्या प्रमुख उपस्तितीत ललगुण गावचे सुपुत्र , आयटीसेल जिल्हा अध्यक्ष विशाल भाऊ भोसले यांची जिल्हा सरचिटणीस पदाची नियुक्ती करण्यात आली .

 विशाल भोसले  यांनी अनेक वर्ष प्रामाणिक चळवली मध्ये काम केलेले आहे . जिल्ह्यातील कोणत्याही गावातील लोकांवर अन्याय आत्याचार  झाला तर ते प्रामाणिक न्याय देण्याची भूमिका बजावत असतात . सखोल माहिती घेऊन थेट राष्ट्रीय अध्यक्ष पासून राज्य कमिटी, संपूर्ण सातारा जिल्ह्यात ही माहिती निर्भीड पणे पोहचवण्याचे  काम अनेक वर्ष केले आहे . विशाल भाऊ यांच्या कार्याची दखल घेऊन  महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष  बाळासाहेब पवार,महाराष्ट्र महासचिव  दादासाहेब ओव्हाळ, व राज्य संघटक कैलास जोगदंड बघून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने  विशाल भोसले यांची सातारा जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती केली .

  यावेळी सातारा जिल्हा अध्यक्ष सोमनाथ धोत्रे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष जाधव, मान तालुका अध्यक्ष सनी खरात ,खटाव तालुका अध्यक्ष विजय बनसोडे ,जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत शिवशरण ,खटाव तालुका उपाध्यक्ष निलेश अगेडकर , कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोथालजी, जिल्हा युवा अध्यक्ष राज चव्हाण ,किरण ओव्हाळ, तन्मय जगताप तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते .