पाथर्डी : मी एकमेव उमेदवार आहे की, न मागता मला उमेदवारी मिळाली. मागील निवडणुकीत जशी मी राज्यात फिरले, तसेच याही वेळेस फिरणार आहे, असे प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी येथे केले. मुंडे यांनी शुक्रवारी मोहटा देवीचे दर्शन घेतले. यावेळी पाथर्डीत त्यांचे स्वागत झाले. त्या म्हणाल्या, मागील निवडणुकीत प्रीतम मुंडे उमेदवार असतानाही मी राज्यात फिरले. दिलीप खेडकर यांनी मुंडे यांच्या हस्ते मोहटादेवीला चांदीचा मुकुट अर्पण  केला. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राजळे, शिवाजी कर्डिले, अरुण मुंडे, मृत्युंजय गर्ने, अभय आव्हाड, अर्जुन शिरसाठ, नंदकुमार शेळके यांची उपस्थिती होती

प्रीतम मुंडे पाथर्डीत लढणार नाहीत

पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाल्या, मला बीडमध्ये उमेदवारी मिळाल्याने प्रीतम मुंडे या पाथर्डी मतदारसंघातून विधानसभेला उभ्या राहतील, या चर्चेला काही अर्थ नाही. माझ्याशेजारी मोनिका राजळे असून, त्यांचे उगीच टेन्शन वाढवू नका. निवडणुकीत माझ्यासमोर कोण असेल, याचा मी विचार करत नाही. विरोधी उमेदवार हा शत्रू असतो, अशी माझी भावना नाही.