Ticker

6/recent/ticker-posts

उल्हासनगर इमारतीचा अर्धा भाग कोसळला घरावर, एका चुकीमुळे घडली दुर्घटना


प्रतिनिधि कृष्णा महाले 

 उल्हासनगर शांतीनगर भागात इमारतीचे तोडफोड सुरू असताना इमारतीचा आर्धा भाग बाजूच्या घरावर कोसळला. त्यामुळे घराचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सिमरन अपार्टमेंटच्या इमारतीचं तोडफोडीचं काम सुरू होतं. जेसीबीने चुकीच्या पद्धतीने तोडफोड सुरू असताना इमारतीचा अर्धा भाग बाजूच्या घरावर कोसळला. त्या इमारतीचे नाव सिमरन अपार्टमेंट आहे.मात्र उल्हासनगर मध्ये ज्या इमारती तोडल्या जात आहेत, त्यांना कुठेही तंत्रशुद्ध पद्धतीने तोडले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरात मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इमारत तोडताना कोणतीही काळजी कंत्राटदाराने न घेतल्याने सदरची दुर्घटना घडली. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटना घडताच महानगरपालिका कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, मात्र आता तोडफोड करणाऱ्या कंत्राटदारावर महानगरपालिका आता कोणती कारवाई करणार याची नागरिकांना प्रतिक्षा आहे.