प्रतिनिधी /सचिन पाटील
दि.11/3/2024. बभळाज गावात नव्याने बिनविरोध नियुक्त झालेल्या सरपंच सौ योगिता अजमल जाधव यांनी बभळाज गावाचे सरपंच पदाचे पदभार सांभाळले असून विविध विकास कामांना जोमाने सुरुवात केलेली आहे. कामाची सुरुवात खंडोबारायाचे भक्त कै. दामू भक्त लोहार यांच्या समाधी ला लागून खंडोबारायाचे सभामंडप व मंदिरापासून करण्यात आले. दहा वर्षापासून खंडित असलेले मंदिर माजी सरपंच यांच्या पाठपुराव्यानुसार आमदार निधीतून मंजूर करून सदर मंदिराचे बांधकाम सध्याचे सरपंच सौ योगिता अजमल जाधव यांच्या नियंत्रणाखाली अत्यंत बारकाईने करण्यात येत आहे. सध्याचे खंडेराव मंदिराचे पुजारी श्री चंपालाल दामू लोहार यांनी सौ योगिता अजमल जाधव व माजी सरपंच श्री जगन्नाथ महाजन यांचे आभार मानले. तसेच सदर कामाच्या सुरुवातीला शिरपूर तालुक्याचे आमदार श्री काशीराम वेचन पावरा यांनी दिलेल्या शब्दांचे काटेकोरपणे पालन केले असून समस्त ग्रामस्थ त्यांचे आभार व्यक्त करत आहेत.
गावात ठिकठिकाणी विविध विकास कामांना सुरुवात झालेली असून जिल्हा परिषद शाळेला वॉल कंपाऊंड, तसेच गावात होत असलेल्या सांडपाण्याच्या निचरा करण्यासाठी ठिकठिकाणी स्वछ खड्डे आधी कामांना सुरुवात करण्यात आलेली आहे.





Social Plugin