प्रतिनिधि : कृष्णा महाले उल्हासनगर
उल्हासनगर ४ओ.टी. चौक, येथे निशा भगत व ऍड. अनिल बी अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री यांचा संयुक्त जयंती सोहळा व आंतरराष्ट्रीय महिलादिन निमित्त सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळया मध्ये भीम गीतांचा कव्वाली चा कार्यक्रम ठेवण्यात आले, महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी या कार्यक्रमांमध्ये हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या, तसेच यावेळेस प्रमुख पाहुने म्हणून ऋताताई आव्हाड, मध्यावर्ती हॉस्पिटल चे शैल्यचिकित्सक डॉ.मनोहर बनसोडे डॉ.राठोड मॅडम, जिल्हा समन्वयक धनंजय बोराडे माजी नगरसेवक वसुधा बोराडे महिला संघटक जया तेजी माजी नगरसेविका जया साधूवाणी इतर मान्यवर उपस्थित होते





Social Plugin