Ticker

6/recent/ticker-posts

मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी खासगीकरण प्रक्रिया


कीर्तीराज घुगे

आडगाव ( नाशिक ) - घरोघरी केरकचऱ्याचे संकलन व विल्हेवाट करण्यासाठी नाशिक महापालिकेने खासगीकरणातून घंटागाडी सुरू केली आहे. आता शहरात मृत होणारी जनावरे उचलणे व विल्हेवाट लावणे ही सुद्धा खासगीकरणातून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन वर्षे मुदतीचे कॉन्ट्रॅक्ट दिले जाणार आहे.  त्यासाठी १.२७ कोटींच्या खर्चास महासभेने मंजुरी दिली आहे. सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे ७०० सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरातील दोन विभाग तसेच गोदाघाटावरील साफसफाईचे कामही  खासगीकरणातून करण्यात येते.

शहरातील मृत जनावरे उचलणे व विल्हेवाट लावण्याचे कामही खासगी एजन्सीची नेमणूक  करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी एक वर्षाकरिता ४२.५३ लाखांचा खर्च येणार याची अपेक्षा आहे. यानुसार तीन वर्षांकरिता १.२७ कोटींच्या खर्चास महासभेने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.