डॉ गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी.
कारंजा तालुक्यातील वीज वितरणाचा बोजवारा उडाला असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या गंभीर प्रश्नाची दखल घेत शिवसेना तालुका प्रमुख मंगेश अरुणराव पाटील मुंदे यांनी थेट महावितरणच्या वाशिम कार्यालयावर धडक देत मुख्य अभियंता यांना जाब विचारला.
दि. 05 मे रोजी मंगेश पाटील यांनी
निवेदन दिले. निवेदनात कारंजा तालुक्यातील य वीज पुरवठाच्या नेहमी खंडित होणाऱ्या त्रासाबद्दल व संबंधित अधिकारी फोन उचलत नसून फोन बंद ठेवत असल्याचा* गंभीर आरोप केला.
निवेदनात *संपूर्ण कारंजा तालुक्यात 15-20 दिवसांपासून लाईनवरील धोकादायक झाडांच्या फांद्यांची कटाई न केल्याने शॉर्टसर्किट व जीवितहानीचा धोका निर्माण झाल्याचे नमूद केले. तसेच *HT/LT लाईनचे दोन्ही मेंटेनन्स पूर्णपणे ठप्प असल्याने पावसाळ्यापूर्वी तातडीने कारवाईची मागणी केली.
जनता अंधारात आहे. अधिकारी मुजोरी करतात. आता शिवसेना गप्प बसणार नाही. 8 दिवसात काम नाही झालं तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू," असा इशारा यावेळी मंगेश पाटील यांनी दिला.
या निवेदनाच्या प्रती आमदार भावनाताई गवळी पाटील यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आल्या* असून विधानपरिषदेत हा प्रश्न मांडण्याची विनंती केली आहे.
यावेळी मंगेश पाटील यांच्यासोबत शिवसेना ओबीसी सेल तालुका प्रमुख अमोल पाटील भिंगारे, शुभम भोयर,क्षमानंद निमगडे गणेश पाटील धाये पदाधिकारी उपस्थित होते.





Social Plugin