ज्ञानेश्वर साळुंके 

अंबड: शासनाच्या नगर विकास विभागामार्फत दरवर्षी यशस्वी महिलांच्या बचत गटांचा गुणगौरव म्हणून यशोगाथा नावाची पुस्तिका प्रकाशित केली जाते या पुस्तिकेमध्ये महाराष्ट्रभरातून यशस्वी बचत गटांचा तसेच नवीन उद्योग करू पाहणाऱ्या नव-उद्योजक बचत गटांची यशोगाथा या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित केली जाते. या आर्थिक वर्षातील 20 एप्रिल 2023 रोजी प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांचे हस्ते झाले होते. ज्यात राष्ट्रमाता स्वयंसहायता महिला बचत गट, नुतन वसाहत अंबड, जि. जालना या जालना जिल्ह्यातून एक यशस्वी उद्योजक गट म्हणून दखल घेतलेली आहें. गटातील सेवा व उद्योग करणारी सुमनताई विष्णुकुमार शेळके ताईंनी गट आणि परिसरच नव्हें शहर आणि तालुक्यातील महिला व मुलींना ब्युटी पार्लर, मेहंदी कोन बनवणे, केक तयार करणे, शिवणकाम याचे प्रशिक्षण देणारा गट म्हणून या गटाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. अंबड नगर परिषदेला सदर पुस्तिका प्राप्त होताच नगर परिषदेचे माननीय मुख्याधिकारी श्री मनोज उकिरडे यांनी बचत गटातील महिलांना पुस्तिका सुपूर्त केली. 

यादरम्यान बचत गटातील सद्स्य सुमनताई शेळके व संजीवनीताई धांडे यांच्यासह इतर महिलांनी बचत गटामार्फत महिलांसाठी योगा क्लास सुरू करण्यासाठी जागा व भौतिक संसाधने उपलब्ध करून देण्याची मागणी मा.मुख्याधिकारी यांना केली. विविध उपक्रमात सहभागी असणाऱ्या हा गट यापुढें शहरातील महिलांसाठी योगा क्लास सुरू करून अजून एक भर पाडणार आहे. सदर गटाला सुरु करुन सक्षम करण्यासाठी व स्वतःचा व्यवसायात करण्यासाठी नगर परिषदेचे NULM कर्मचारी अधिकारी श्री. संजीव मैंद (सहायक प्रकल्प) , व श्री. शरद मगर (समुदाय संघटक) यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.