हदगाव शहरातील तामसा रोड येतील बुद्ध भूमी वसाहत मध्ये नल कनेक्शन देऊन एक वर्ष झाली. मेन लाईन ला फुल्ल पाणी येत पण त्याच लाईन चा दुसऱ्या टोकाला पाण्याचा एक थेंब पण येत नाही . C.o. साहेब आणि तेथील पाणी पुरवठा कर्मचारी यांनी काही महिन्या अगोदर सर्व तपासणी करून गेले आणि टाके फुल्ल करून पाणी सोडून बघितले तेंव्हा पाणी सर्वांना मिळाले एका महिन्याने जैसे थे झाले पुढील लाईन ला फुल्ल पाणी आणि शेवटी टोकाकडे एक थेंब नाही.यामुळे येथील लोकांना पूर्वी सारखी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
असे c.o. साहेबाना कळवले तर ते यांना बोला त्यांना बोला करून ते कर्मच्यारकडे लोटत आहेत आणि कर्मचारी त्यांचेकडे म्हणजे एक मार्गी टाळाटाळ चालू आहे पण तेथील लोकांची बेहाल होत आहे गेली कित्तेक महिने नळा कडे बगून निराश होत आहेत. पाणी सोडले तर सर्वांना एक समान मिळाले की नाही हे बघणे नगर पालिकेचे काम आहे.पण कर्मचारी टाळाटाळ करतात.त्यामुळे सर्वांना पाणी मिळत नाही. लोक संतापली आहेत. जल जीवन नले नुसती वर्षा काठी पट्टी गोळा करण्यासाठी ठेवली आहेत. ज्यांच्या घरी बोर आहेत त्यांना कसली चिंता नाही.पण ज्याचा पाण्याचा स्त्रोत एकमेव नल असेल त्यांचे कसे ?
.jpeg)




Social Plugin