प्रतिनिधी - सागर सोहनी
रष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेश संघटक सचिव रावसाहेब पाटील यांची मागणी.माणदेश जिल्हा व्हावा म्हणून काही जणांना आनंदाच्या उकळ्या फुटलेले आहेत मी एक मानदेशी कार्यकर्ता आहे जर मान देशाचा आटपाडी तालुका हाच जिल्ह्याचे ठिकाण होणार असेल तर सगळ्यांच्या भावनांचा आदर करून मीही या मानदेश जिल्हा निर्मितीला पाठिंबा देऊ शकतो.माझा राज्य सरकारला सवाल आहे या नवीन जिल्हा निर्मितीच्या पाठीमागे सरकारचा उद्देश काय आहे कशासाठी नवीन जिल्हे तयार केले जात आहेत या प्रश्नाचं सविस्तर उत्तर नव्या जिल्ह्याची निर्मिती करणाऱ्यांनी देणे आवश्यक आहे.या नवीन 21 जिल्हा निर्मितीमध्ये कदाचित महाराष्ट्राचे भविष्यात तुकडे पाडण्याची या सरकारची
दूरदृष्टी दिसून येते कारण 21 पैकी जवळजवळ 18 जिल्हे हे नव्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होणार आहेत विदर्भामध्ये फक्त तीन नव्या जिल्हयाची निर्मिती आहे याचा सरळ अर्थ आहे ही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील जिल्ह्यांची संख्या मोजून स्वतंत्र विदर्भाची निर्मिती करण्याचा त्यांचा हेतू यामध्ये स्पष्ट दिसून येतो मुळात नवीन जिल्हा निर्मितीसाठी एक जिल्ह्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा भार शासनावर पडणार आहे हे पैसे शासन कसे उभा करणार आहे याचा तपशील ही शासनाला दयावा लागेल कारण सध्या लाडक्या बहिणीला दरमहा दीड हजार रुपये देण्यामुळे सरकारकडे नोकरदारांचे पगार वेळेवर भागवण्यासाठी पैसे नाहीत अशी सत्य परिस्थिती असताना सरकारने निवडणुकीमध्ये
शेतकऱ्यांची सर्व कर्जे माफ करण्याची घोषणा दिली होती त्या घोषणेपासून माणसांचे व नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नव्या जिल्ह्याची घोषणा असण्याची शक्यता नाकारता येणार नाही एक तर महाराष्ट्राचे विभाजन करण्याचे दूरदृष्टी असेल किंवा विकास करता येत नाही विकासाच्या कामाला पैसा
नाही म्हणून अशा फसव्या घोषणा करून लोकांना मनोरंजित करण्याचा हा प्रकार तर राज्य शासन करत नाही ना अशी सर्वसामान्य महाराष्ट्रीयन जनतेला शंका येऊ लागलेली आहे.





Social Plugin