Ticker

6/recent/ticker-posts

वाचन संस्कृती संवर्धनासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा स्तुत्य उपक्रम.-प्रा. डॉ. संजय क्षीरसागर



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे] 

राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत पुस्तक परीक्षण उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत  भंडारे होते .  पुसेगाव महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. संजय क्षीरसागर प्रमुख पाहुणे होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संजय क्षीरसागर  म्हणाले मोबाईल जगतापासून मोकळीक मिळवण्यासाठी शासनाने राबविलेला वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा स्तुत्य उपक्रम आहे . वाईट प्रसंगातून सावरण्यासाठी पुस्तकाची मैत्री केली तर आयुष्य सुखकर होते. ग्रंथ प्रदर्शनाने वाचन संस्कृतीस प्रेरणा मिळते.वाचाल तर वाचाल.  महापुरुषांची चरित्रे वाचावी. वाचनाने आपल्या जीवनास प्रेरणा मिळते. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त असणारी पुस्तके वाचल्याने जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. तिचा उपभोग घेता आला पाहिजे. जागतिक ज्ञान मिळवण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान असण्याबरोबरच आपल्या मातृभाषेचे नवीन पिढीला ज्ञान असणे गरजेचे आहे. वास्तव जीवन अनुभवण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करावी.

पुस्तक परीक्षण स्पर्धेत अर्पिता घारगे, प्रतीक्षा येवले ,प्रिया पवार, अश्विनी माने , सानिका घाडगे, कोमल घाडगे, सानिका येवले या विद्यार्थिनींनी  मृत्युंजय, श्यामची आई, दासबोध इत्यादी  पुस्तकांचे परीक्षण सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. साहेबराव अन्नापुरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. नामदेव तेलोरे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.