बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 सन १९५९ साली स्थापन झालेल्या मुक्ताई। महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीम. श्रद्‌धताई तांदूळवाडकर व महिला  सदस्य यांच्या अथक प्रयत्न आणि आणि पाठ-पुराव्यातून बांधलेल्या महिला मंडळाच्या सभागृहाचे उद्‌घाटन संपन्न झाले.या  कोरेगाव -खटाव विधानसभा मतदार संघाचे  कार्यसम्राट आमदार  महेशदादा शिंदे  व  मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव वैभव राजेघाटगे, ग्रामपंचायत बुध यांनी मोलाचे सहकार्य केले.या सभागृहाचे उद्‌घाटन  आमदार महेश शिंदे यांच्या सुविध्य पत्नी डॉ. सौ. प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते आले. 

कार्यक्रमास  वैभव, राजे घाटगे, तसेच आमदार महेश शिंदे यांच्या भगिनी डॉ. अरुणाताई बर्गे , ग्रामपंचायत बुधच्या   सरपंच  सौ. सुजाता बोराटे, उपसरपंच  श्री. अभयसिंह  राजेघाटगे इ.  मान्यवर उपस्थित होते.आपल्या मनोगतामध्ये  श्री. वैभव राजेघाटगे यांनी बुधच्या महिलांचा गौरवशाली इतिहास सांगितला त्याचप्रमाणे महिला सभागृह बांधण्याचा उद्‌देश व सरकार-च्या महिलांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली . डॉ. प्रियाताई शिंदे यांनी आपल्या मनोगता-मध्ये महिलांसाठी असणाऱ्या उद्योगाविषयी माहिती दिली. तस्येच सुसंस्कृत पिढी घडविण्याबाबत मार्गदर्शन केले व बुधच्‌या महिलांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच दिले.

मुक्ताई महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीम. श्रद्‌धाताई तांदूळवाडकर यांनी आपल्या मनोगतातून महिला मंडळाच्या कामकाजाची माहिती दिली.सौ. मिनाक्षी खोत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.तर सौ. वृषाली गाडे यांनी आभार मानले.कार्यक्रमास श्री भरत मुळे, श्री. शेखर घाटगे ,के. डी. पवार सर, . नेलवडे सर . श्री. शशिकांत खोत हे मान्यवर उपस्थित होत.

या कार्यक्रमास मुक्ताई महिलामंडल अध्यक्षा श्रद्‌धाताई तांदुळवाडकर, उपाध्यक्षा सौ. दिपाली बागवडे, सौ मेधाश्री पात्रेकर,  सौ. स्वाती जंगम, सौ. पुष्पा पवार, सौ. वनिता इंगळे, सौ. लक्ष्मी बागवडे, सौ अलका  तांदुळ‌वाडकर, सौ. शुभांगी तंटक, सौ. वासंती पोतदार, सौ नंदा घोंगडे, श्रीम. उज्वला बागवडे व इतर सर्व सदस्यांच्या अथक प्रयत्नातून सभागृहाच्या दिमाखदार सोहळा उत्साहीत पार पडला.