Ticker

6/recent/ticker-posts

होळी मोठ्या उत्साहात साजरी



    प्रतिनिधी, पी के गावीत

            भवाड्यात प्रत्येक वर्षी होळी त्या उत्साहाने साजरी करण्यात येते. होळी ही आदिवासी भागात लहान होळी एक मोठी होळी अशा दोन होळ्या पेटवल्या जातात. पहिली होळी उंबराच्या झाडाची होळी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी बांबूची झाडाची होळी पेटवली जाते.

             यामध्ये होळी आणताना तोडायच्या अगोदर ते झाडाची पूजा केली जाते. नगारा ढोल ताशा ने नातच गाजत होळीच्या ठिकाणी आणली जाते. व नंतर नागरीच्या पिठाची तांदळाच्या पिठाच्या पापड्या बांबूच्या झाडाला  बांधले जाते. वाढलेल्या झाडा फाट्या करून एकत्र करून होळी पेटवली जाते.

            होळी पेटवायच्या अगोदर होळी भोवती ढोलकी वरती गाणे म्हणतात होळीला फेऱ्या मारतात. नैवेद्य  दाखवतात होळी खाली पडल्यावर वरचा शेंडवविहरित बुड हून आणल्यानंतर परत त्या होळीत टाकतात. होळी जवळ  पूजा करून मारुतीच्या मंदिरात दर्शन घेऊन जो भेटल त्यांच्या भेटी घाठी घेतात.

             नंतर आई वडिलांशी दर्शन घेतात. नंतर डाळ्या,खजूर, वाटी, हार्ड लहान पोरं खातात. रात्र झाल्यावर कोणती पण वस्तू चोरतात सकाळीस ज्या माणसाशी वस्तू चोरतात त्याच्या कडं वाटी मागतात आणि रात्री ढोलगी ताशावर गाणे लागून नाचतात.दुसऱ्या दिवशी सण साजरी करतात.